Site icon कार्यारंभ लाईव्ह

धारूर नगरपरिषदेसाठी भाजपाकडून रामचंद्र निर्मळ यांचाउमेदवारी अर्ज दाखल

किल्ले धारूर │ सचिन थोरात

दि.17 : होऊ घातलेल्या धारूर नगरपरिषद निवडणुकीत भाजपाकडून नगराध्यक्ष पदासाठी रामचंद्र अंबादास निर्मळ यांच्या नावाची अचानक दोन दिवसांपूर्वी चर्चा सुरू झाली होती. पंकजाताई मुंडे यांचे विश्वासू माधव निर्मळ यांचे ज्येष्ठ बंधू असलेल्या रामचंद्र निर्मळ यांनी अखेर 17 नोव्हेंबर, सोमवार रोजी समर्थकांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल केला.

अर्ज दाखल करताना भाजप कार्यकारिणी सदस्य आणि माजी नगराध्यक्ष डॉ. स्वरूपसिंह हजारी हे स्वतः उपस्थित होते. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून डॉ. हजारी नाराज असल्याच्या पसरलेल्या चर्चांना पूर्णविराम मिळाल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. नगराध्यक्ष पदासाठी भाजपच्या उमेदवारीला मिळालेली ही साथ आगामी निवडणुकीत पक्षाच्या रणनीतीला बळ देणारी ठरल्याचेही मानले जात आहे. यावेळी भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष संजय आंधळे,सादिक भाई इनामदार, चोले साहेब, विक्रांत हजारी, संदीप काचगुंडे, भाजपाचे शहराध्यक्ष दत्ताभाऊ धोत्रे, एडवोकेट मोहन भोसले, शिवाजी मुंडे,लालासाहेब तिडके तसेच मोठ्या संख्येने कार्यकर्ते आणि मान्यवर उपस्थित होते.

Exit mobile version