modi

पंतप्रधान मोदींची रोजगार निर्मितीसाठी 50,000 कोटींची घोषणा!

देश विदेश राजकारण

6 राज्यातील 116 जिल्ह्यांना मिळणार लाभ!

दिल्ली ः करोना महामारीमुळे करण्यात आलेल्या लॉकडाउनमुळे अनेक मजूर आपल्या गावी परतले. अशाच मजूरांसाठी मोदी सरकार नव्या योजनाची घोषणा करणार आहेत. स्थलांतरीत मजूरांसाठी केंद्र सरकारने 50 हजार कोटी रुपयांचे पॅकेज तयार केलं आहे. याअंतर्गत रोजगारनिर्मिती करण्यात येणार आहे. याचा फायदा सहा राज्यातील 116 जिल्ह्यांना होणार आहे.

या योजनेचे नाव ‘गरीब कल्याण योजना’ असे असून, योजनेचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या, शनिवारी 20 जून रोजी बिहारमधील खगडिया गावातून होणार आहे, अशी माहिती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली. शुक्रवारी पंतप्रधान व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे योजनेचा शुभारंभ करणार आहेत.

बिहार, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान, ओडिशा, झारखंड अशा सहा राज्यांतील 116 जिल्ह्यांमधील ही योजना सुरू होणार आहे. या योजनाचा लाभ 29 लाख मजुरांना होणार असून पुढील 4 महिने रोजगाराची हमी देणारी योजना राबवली जाणार आहे.

‘गरीब कल्याण योजना’ या योजनेअंतर्गत कामगारांना 25 प्रकारची कामं दिली जाणार आहे. यामध्ये अंगणवाडी केंद्र, ग्रामीण रस्ते, ग्रामीण आवास, रेल्वेची कामं, सोलार पम्पसेट, फायबर ऑप्टिक केबल पसरवण्याचं काम अशा प्रकारची कामे असणार आहेत.

कार्यारंभ आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@karyarambhbeed) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Tagged