acb office beed

वर्षाच्या शेवटचा ट्रॅप ; दोन लाचखोरांवर गुन्हा

बीड


बीड दि.31 : बुधवार, 31 डिसेंबर रोजी नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला बीड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या टिमने लाचखोरावर कारवाई केली आहे. 2025 या वर्षातील हा शेवटचा ट्रॅप असून या कारवाईने खळबळ उडाली आहे.

जळावू लाकडाची गाडी चालवू देण्यासाठी पाटोदा वनपरिक्षेत्रातील वनरक्षक दादासाहेब तेजराव मलमल (जोशी) याने हप्ता म्हणून एक हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. ही एक हजाराची लाच रायमोहा येथील हॉटेल चालक दिगांबर चौधरी याने दादासाहेब मलमल यांच्यासाठी स्विकारली. याप्रकरणी दोघांवरही रात्री उशीरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती. ही कारवाई बीड एसीबीचे उपअधीक्षक सोपान चिट्टमपल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने केली.