AJIT PAWAR

बीड

अजित पवार यांचे विमान अपघातात दुर्दैवी निधन

By DHANANJAY JOGDE

January 28, 2026

बारामती – जिल्हा परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने बारामतीला विमानाने निघालेल्या अजित पवारांच्या छोट्या विमानाला गंभीर अपघात झाला आहे. ह्या अपघातात विमान जमिनीवर कोसळले असून त्याला आग देखील लागल्याचं दिसतय. या अपघातात अजित पवार यांच्यासह त्यांचे काही पीए आणि इतर चार ते पाच जण गंभीर जखमी झाल्याची माहिती देखील मिळत आहे त्यांना बारामतीच्या रुग्णालयात हलवण्यात आले आहे. बारामतीत विमानतळावर विमान लँड होत असताना हा अपघात झाल्याचं सांगितलं जातं. सकाळी 9:15 च्या सुमारास हा अपघात झाल्याचे देखील सांगण्यात आलं. पावणेदहा वाजता आलेल्या एका वृत्तानुसार अजित पवार यांचे या गंभीर अपघातात दुःखद निधन झाल्याची माहिती मिळाली आहे. विमानातील इतर सहाही प्रवाशांचा मृत्यू देखील झाल्याचे सांगण्यात आले