बीड

पिंपळनेर पोलीस ठाणे हद्दीत अफूच्या शेतीचा पर्दाफाश !

By Keshav Kadam

February 27, 2026

पोलीस उपअधीक्षक पूजा पवार यांची कारवाई; ७० ते ८० झाडे जप्त

बीड, दि. २७ : पिंपळनेर पोलिस ठाणे हद्दीत बेकायदा अफूची शेती केल्याचा प्रकार उघडकीस आला असून बीडच्या पोलीस उपअधीक्षक पूजा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली शुक्रवारी (दि.२७ फेब्रुवारी) सकाळी सुमारे १० वाजण्याच्या सुमारास धडक कारवाई करण्यात आली.

या कारवाईत अंदाजे ७० ते ८० अफूची झाडे आढळून आली आहेत.गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी संबंधित ठिकाणी छापा टाकला असता शेतीमध्ये अफूची लागवड केल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी तत्काळ पंचनामा करून झाडे जप्त करण्याची प्रक्रिया सुरू केली असून मुद्देमाल हस्तगत केला जात आहे. संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास पोलीस प्रशासनाकडून करण्यात येत आहे. या कारवाईमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. भविष्यात अशा प्रकारांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही पूजा पवार यांनी दिला आहे.