बीड

बीडमध्ये एसीबीने लाचखोर पकडला!

By Keshav Kadam

April 13, 2026

-घरझडतीसाठी एसीबीचे पथक रवानाबीड दि.11 : जिल्ह्यात भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात वाढलेला असल्याचे सातत्याने होणार्‍या एसीबीच्या कारवाईवरुन सिद्ध होत आहे. बीड शहरातील पालवण चौक परिसरात जालना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सोमवारी (दि.13) शासकीय निरीक्षणगृहाचा प्रभारी अधीक्षक कपिल भीमराव कांबळे याला 30 हजार रुपयांची लाच घेताना सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास रंगेहात पकडले आहे.

तक्रारदार हा सुरक्षा रक्षक असून त्याची हजेरी सुरळीतपणे वरिष्ठांकडे पाठवण्यासाठी आणि संबंधित आदेश काढण्यासाठी कपिल कांबळे याने 45 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. तडजोडीअंती 30 हजार रुपये देण्याचे ठरले. याप्रकरणी रविवारी तक्रार प्राप्त झाली होती. तक्रारीची शहानिशा केल्यानंतर जालना एसीबीच्या पथकाने सोमवारी पालवण चौक परिसरात सापळा रचला. यावेळी लाचेची 30 हजार रुपयांची रक्कम स्वीकारताना कांबळे याला रंगेहात पकडून ताब्यात घेण्यात आले. दरम्यान घरझडतीसाठी बीड एसीबीचे एक पथक रवाना केले असून पुढील कारवाई सुरु आहे. सातत्याने होत असलेल्या लाचखोरीच्या कारवाईने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.