Site icon कार्यारंभ लाईव्ह

बीड :पाच हजाराची लाच घेताना रंगेहाथ पकडले !

बीड, दि. 20 : लाचखोरीच्या घटना जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वाढला आहे. तलवाडा येथील ग्रामसेवक सोपान मुसळे याला पाच हजार रुपयांची लाच घेताना जालना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित तक्रारदाराकडून चालू पीटीआर देण्यासाठी मुसळे यांनी सुरुवातीला 10 हजार रुपयांची लाच मागितली होती. मात्र तडजोडीनंतर 5 हजार रुपयांवर व्यवहार ठरला. याबाबत तक्रारदाराने जालना एसीबीकडे तक्रार दाखल केली होती.त्यानुसार, सोमवारी (दि. 20) गेवराई येथील कार्यालयात सापळा रचून कारवाई करण्यात आली. यावेळी मुसळे हे तक्रारदाराकडून 5 हजार रुपयांची लाच स्वीकारताना एसीबीच्या पथकाने रंगेहात पकडले.

ही कारवाई जालना एसीबीचे उपअधीक्षक बाळासाहेब जाधवर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. दरम्यान, या प्रकरणी गेवराई पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास सुरू आहे.

Exit mobile version