– १८ हजारांची लाच घेताना रंगेहात पकडले.
केशव कदम – बीड दि.21 : जिल्ह्यात लाचखोरीचे प्रकार दिवसेंदिवस वाढताना दिसत असून आता महिला अधिकारी देखील त्याला अपवाद राहिलेल्या नाहीत. आष्टी येथील महावितरण कार्यालयातील सहायक अभियंता कोमल शिंदे यांना १८ हजार रुपयांची लाच स्वीकारताना मंगळवारी (दि.२१) बीड येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहात पकडले.
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदाराच्या सोलर प्रकल्पाचे पडताळणी करून देण्यासाठी कोमल शिंदे यांनी मोबदल्याच्या स्वरूपात १८ हजार रुपयांची लाच मागितली होती. तक्रारदाराने याबाबत एसीबीकडे तक्रार दाखल केली. तक्रारीची पडताळणी करून एसीबीने सापळा रचला. दरम्यान, मंगळवारी तक्रारदाराकडून १८ हजार रुपयांची लाच स्वीकारताना सहायक अभियंता कोमल शिंदे यांना एसीबीच्या पथकाने रंगेहात अटक केली. ही कारवाई बीड एसीबीचे उपअधीक्षक सोपान चिटमपल्ले यांच्यासह त्यांच्या पथकाने केली. या घटनेमुळे महावितरण विभागात खळबळ उडाली असून पुढील तपास एसीबीकडून सुरू आहे.
(सूचना : बातमीत वापरलेला फोटो हा Ai निर्मित आहे..)

