बीड

महावितरणच्या कोमल शिंदेला दोन दिवसाची पोलीस कोठडी

By Keshav Kadam

April 22, 2026

बीड दि.22 : आष्टी येथील महावितरण कार्यालयातील सहायक अभियंता कोमल अर्जून शिंदे यांना 18 हजार रुपयांची लाच स्वीकारताना मंगळवारी (दि.21) बीड येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले होते, बुधवारी बीड येथील न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

note : this use image is AI

कोमल अर्जून शिंदे (वय 39, रा.तिसगाव ता.पाथर्डी) या महावितरणच्या आष्टी उपविभागात सहायक अभियंता म्हणून कार्यरत होत्या. तक्रारदाराची सोलार एजन्सी आहे. त्यांनी प्रधानमंत्री सुर्य घर योजनेअंतर्गत बसवलेल्या सोलारची तपासणी व रिलीज ऑर्डर देण्याचा मोबदला म्हणून एका ग्राहकाचे 2000 याप्रमाणे 8 ग्राहकाचे 16 हजार व मागील जनरेशन मीटर अ‍ॅड करण्याचे तीन हजार असे 19 हजार रुपयांची लाच मागितली. तडजोडअंती 18 हजाराची लाच स्विकारतांना रंगेहाथ पकडले होते. त्यानंतर तिच्या आहिल्यानगर येथील घर झडतीत काहीही आढळून आले नाही. बुधवारी बीड येथील न्यायालयासमोर हजर केले असता दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. अधिक तपास उपअधीक्षक सोपान चिटमपल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक समाधान कवडे हे करत आहेत.