बीड, दि. 29 : बीड तालुक्यातील पाली/कपिलधार ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाच्या पोटनिवडणुकीसाठी मंगळवारी मतदान पार पडले. अत्यंत चुरशीच्या झालेल्या या निवडणुकीत नागनाथ ग्रामविकास पॅनलच्या राणी गणेश नवले यांनी 550 मतांनी दणदणीत विजय मिळवला.
या निवडणुकीत मतदारांनी मोठ्या उत्साहात सहभाग नोंदवला होता. निकाल जाहीर होताच नवले समर्थकांनी गुलालाची उधळण करत जल्लोष साजरा केला. गावात विजयानंतर आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून समर्थकांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. नवीन सरपंच म्हणून राणी नवले यांच्याकडून गावाच्या विकासाला गती मिळेल, अशी अपेक्षा ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे.


