क्राईम

विवाहितेची गळफास घेवून आत्महत्या

By Karyarambh Team

June 19, 2020

गेवराई : एका वीस वर्षीय विवाहितेने आपल्या राहत्या घरामध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना गुरुवारी (दि.18) मध्यरात्रीच्या सुमारास तालुक्यातील केकतपांगरी येथे घडली. आत्महात्या कशामुळे केली याचे कारण अद्याप समजले नाही.

तमन्ना आग्नेश भोसले (वय 20 रा.केकतपांगरी ता.गेवराई) असे मयत महिलेचे नाव आहे. तिने गुरुवारी मध्यरात्री घराच्या आडूला गळफास घेवून आत्महत्या केली. ही बाब घरच्यांना माहिती होताच घरात एकच गोंधळ उडाल्याने गावातील नागरिक घटनास्थळी धावून घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलीस जमादार उबाळे यांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनेचा पंचनामा केला. आत्महात्या कशामुळे केली याचे कारण अद्याप समजलेले नाही. पुढील तपास पोलीस करत आहेत.