Site icon कार्यारंभ लाईव्ह

बीड: तीन हजारांची लाच घेताना लाचखोर पकडला!

acb office beed

acb office beed

केशव कदम बीड

दि.7: जिल्ह्यात लाचखोरीच्या घटना सातत्याने समोर येत असतानाच एका ग्रामरोजगार सेवकाला लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहाथ पकडले आहे.

पीएम घरकुल योजनेअंतर्गत मस्टरचे पैसे काढून देण्यासाठी एका मस्टरमागे १०० रुपये या प्रमाणे ३० मस्टरसाठी एकूण ३ हजार रुपयांची लाच स्वीकारताना ग्रामरोजगार सेवक गोविंद सोपान गोरे (वय ५०, रा. बनसारोळा, ता. केज, जि. बीड) याला एसीबीच्या पथकाने बनेश्वर मंदिराजवळ रंगेहाथ पकडले. गोरे हा ग्रामपंचायत बनसारोळा येथे ग्रामरोजगार सेवक म्हणून कार्यरत आहे. तक्रारदाराकडून लाचेची मागणी केल्यानंतर पडताळणी करण्यात आली. त्यानंतर सापळा रचून लाच स्वीकारताना त्यांना ताब्यात घेण्यात आले. ही कारवाई बीड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक सोपान चिटमपल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक समाधान कवडे, पोलीस अंमलदार मच्छिंद्र बिडकर, पांडुरंग काचंगुंडे, अविनाश गवळी तसेच चालक गणेश म्हेत्रे यांच्या पथकाने केली. या प्रकरणी युसुफवडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

Exit mobile version