Site icon कार्यारंभ लाईव्ह

बीड : तब्बल एक लाखाच्या लाचेची मागणी प्रकरणी गुन्हा दाखल!

बीड एसीबीच्या कारवाईने जिल्ह्यात खळबळ

केशव कदम बीड

अंबाजोगाई दि.4 : तक्रारदाराच्या शेतीच्या फेरफाराची नोंद करून देण्यासाठी तब्बल एक लाख रुपयांच्या लाचेची मागणी केल्याप्रकरणी अंबाजोगाई तालुक्यातील लोखंडी सावरगाव येथे मंडळ अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या सतीश विठ्ठलराव भुसेवाड (वय ४१, रा. बानाई नगर, अंबाजोगाई) याच्याविरुद्ध अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तक्रारदार यांच्या शेतीच्या फेरफार नोंदीची कार्यवाही करून देण्यासाठी संबंधित मंडळ अधिकाऱ्याने एक लाख रुपयांची लाच मागितल्याची तक्रार बीड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे करण्यात आली होती. त्यानुसार एसीबीच्या पथकाने पडताळणी केली असता लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. दरम्यान, संशय आल्यामुळे मंडळ अधिकाऱ्याने लाचेची रक्कम स्वीकारली नाही. त्यामुळे लाच स्वीकारण्याची मागणी केल्याप्रकरणी त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई बीड एसीबीचे उपअधीक्षक सोपान चिटमपल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. प्रकरणाचा पुढील तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून सुरू आहे.

Exit mobile version