Site icon कार्यारंभ लाईव्ह

बीड : 20 हजारांची लाच घेताना लाचखोर पकडले!

acb trap

केशव कदम – बीड

दि.14 : लाचखोरीच्या घटनांचे प्रमाण जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वाढल्याचे दिसत आहे. कुठलेही काम पैसे दिल्याशिवाय होत नाही. तक्रारदाराचा चौकशी अहवाल व्यवस्थित तयार करून तो वरिष्ठ कार्यालयाकडे पाठवू नये, यासाठी 20 हजार रुपयांची लाच स्वीकारताना केज येथील शिक्षण विभागातील दोन कर्मचाऱ्यांना जालना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने बुधवारी (दि.१४) दुपारी तीनच्या सुमारास रंगेहाथ पकडले.

दत्तात्रय मुरलीधर चाटे, कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी, पंचायत समिती केज (वय 56) आणि जयगुरु शिवाजी गिरी (जिल्हा परिषद शिक्षक तांदळे वस्ती) अशी कारवाई करण्यात आलेल्या लाचखोरांची नावे आहेत.

केज येथील शिक्षण विभागाच्या गट साधन केंद्रात ही कारवाई करण्यात आली. तक्रारदाराच्या चौकशी अहवालासंदर्भात वरिष्ठ कार्यालयाकडे अहवाल पाठविण्याची प्रक्रिया सुरू असताना, तो व्यवस्थित तयार करून वरिष्ठ कार्यालयाकडे पाठवू नये, यासाठी संबंधितांकडून 20 हजार रुपयांच्या लाचेची मागणी करण्यात आली. या प्रकरणी जालना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने बुधवारी सापळा रचला. लाचेची मागणी आणि त्यानंतर लगेच कारवाई करण्यात आली. तक्रारीची दखल घेऊन तातडीने सापळा रचत कारवाई केल्याबद्दल जालना एसीबीच्या पथकाचे कौतुक होत आहे. या प्रकरणी केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.

Exit mobile version