माजलगाव दि.18 : खामगाव-पंढरपूर राष्ट्रीय महामार्गावर पाथरूडजवळ रविवारी (दि. १८ ऑक्टोबर) सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास बस आणि हुंडाई चारचाकी कारचा भीषण अपघात झाला. या अपघातात कारमधील पाच जणांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. मयत हे माजलगाव येथील असून या घटनेमुळे माजलगाव परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, खामगाव-पंढरपूर राष्ट्रीय महामार्गावरील पात्रूड दरम्यान बस (एमएच २०-२७४०) आणि हुंडाई कारचा (एमएच २६-४२१०) भीषण अपघात झाला. या धडकेत हुंडाई कारमधील पाच जणांचा मृत्यू झाला. मृत व्यक्ती माजलगाव शहर आणि तालुक्यातील एका गावातील रहिवासी असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. या अपघातातील मृतांची नावे आणि अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या दुर्दैवी घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे.