majlagaon murder

माजलगावमध्ये विवाहितेचा खून की आत्महत्या?

क्राईम न्यूज ऑफ द डे माजलगाव

 माजलगाव :  शहरानजिक भाटवडगाव वस्तीत एका विवाहित महिलेने गळफास घेतल्याने मृत्यू झाला आहे, असा बनाव पतीकडून करण्यात आला आहे. परंतू ही आत्महत्या नसून तिच्या पतीनेच खून केला असल्याचा आरोप मयताच्या वडिलांनी केला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत.

     भाटवडगांव वस्तीत रामेश्वर प्रकाश तौर हे त्यांच्या कुटूंबासह राहतात. रविवार दि.21 रोजी रात्री 12.30 वा. दरम्यान पत्नी सारिका (वय 30 वर्षे) हिच्यासोबत पिवून आलेल्या रामेश्वरचा वाद झाला होता. या दरम्यान पत्नीला जेवायला वाढ असे म्हणत वाद घालत होता, यावर पत्नी सारीकाने जेवायला वाढले. परंतू वाद वाढत गेल्याने रागाच्या भरात रामेश्वर याने पत्नी सारीकाच्या डोक्यात कुकरचे भांडे मारल्याने तीचा जागीच मृत्यू झाला. परंतू रामेश्वरने खून पचवण्याच्या उद्देशाने पत्नी सारीकाने ओढणीने गळफास घेतल्याचा बनाव केला. यावर त्याने शहरातील देशपांडे हॉस्पिटल येथे आणले, परंतू डॉक्टरांने तीचा मृत्य झाल्याचे सांगून पोलिसांना याबाबत कळवले, असा आरोप मयत सारीकांचे वडिल अशोक माणिकराव सक्राते यांनी केला आहे. मयत सारीकाचे प्रेत शवविच्छेदनासाठी माजलगाव ग्रामीण रूग्णालयात आणले आहे. दरम्यान अद्याप याप्रकरणी गुन्हा दाखल झाला नाही.

 पतीनेच खून केल्याचा नातेवाईकांचा आरोप

माझी मुलगी सारीका हिस पती रामेश्वर तौर हा सतत दारू पिवून येवून मारहाण करत होता, तसेच तिला मानसिक त्रास ही देत असे. यातूनच माझ्या मुलीचा रामेश्वरने खून केला आहे, परंतू तो गळफास घेतल्याचा बनाव करत असल्याचा आरोप मुलगी सारिकांचे वडिल अशोक सक्राते यांनी केला आहे.