corona

देशातील कोरोनाबाधितांचा आकडा 4 लाखांच्या पुढे.

देश विदेश

नवी दिल्ली | देशभरातील कोरोनाबाधितांच्या संख्येने आता चार लाखांचा टप्पा ओलांडला आहे. मागील चोवीस तासांत देशभरात आतापर्यंतचे सर्वाधिक तब्बल 15 हजार 413 नवे कोरोनाबाधित रूग्ण आढळले आहेत. तर 306 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.देशात सद्यस्थितीस 4 लाख 10 हजार 461 कोरोनाबाधितांची नोंद झालेली आहे. यामध्ये सध्या उपचार सुरू असलेले 1 लाख 69 हजार 451 जण, उपचारानंतर सुट्टी देण्यात आलेले 2 लाख 27 हजार 756 जण व आतापर्यंत करोनामुळे मृत्यू झालेल्या 13 हजार 254 जणांचा समावेश आहे.

कोरोनावर प्रभावी ठरणारं फेविपिरावीर औषध अखेर भारतात उपलब्ध झालं आहे. औषध तयार करणाऱ्या ग्लेनमार्क फार्मास्युटिकल्स या कंपनीने यासंदर्भातला दावा केला आहे.दरम्यान, या औषधाला सरकारतर्फे मंजुरीही मिळाली आहे. करोनाची सौम्य लक्षणं जाणवणाऱ्या रुग्णांना हे औषध दिलं जाऊ शकतं. ग्लेनमार्क फार्मास्युटिकल्सने फेविपिरावीर फेबीफ्लू ब्रांडच्या नावाने हे औषध समोर आणलं आहे.

Tagged