न्यूज ऑफ द डे

कॉलरट्यूनमधील तो आवाज कुणाचा महितयं का?

By Karyarambh Team

June 21, 2020

echo adrotate_group(3);

बीड : देशात कोरोना व्हायरसची एंट्री झाली होती तेव्हा, लगेच लॉकडाउनची घोषणा करण्यात आली, तत्पुर्वी सगळ्यांच्या वेगवेगळ्या कॉलरट्यून बंद झाल्या आणि अचानक सर्वांना एकच कॉलर ट्यून ऐकायला येऊ लागली. “कोरोना वायरस या कोविड-19 से आज पूरा देश लड रहा है. मगर याद रहे हमें बिमारी से लडना है, बीमार से नहीं. उनसे भेदभाव न करें…” आता हा आवाज प्रत्येकाच्या ओळखीचा झाला आहे. पण हा आवाज कुणाचा हे कोणालाच माहिती नाही. पण हा आवाज आहे, व्हाईस आर्टीस्ट जसलीन भल्ला हिचा.echo adrotate_group(6);

   जसलीन भल्ला वॉइस ओव्हर आर्टिस्ट होण्याआधी एका वृत्तवाहिनीत स्पोर्टस पत्रकार होती. पण गेल्या 10 वर्षांपासून ती फक्त व्हाईस आर्टिस्ट म्हणून काम करते. जसलीनच्या या आवाजामध्ये एक रंजक किस्सा आहे. ती सांगते, “आपला आवाज एक दिवस संपूर्ण देश ऐकेन असं कधीच वाटलं नव्हतं. ती म्हणाली, एक दिवस अचानक हा मेसेज रेकॉर्ड करण्याचे सांगण्यात आले. आरोग्य मंत्र्याकडून हा मेसेज आला असून 30 सेकंदाची मर्यादा असल्याचं सांगण्यात आलं. मी रेकॉर्ड केलं, पण याचं पुढे काय होणार आहे, याची मला कल्पना नव्हती. नंतर मला माझ्या नातेवाइकांचे, मित्रांचे फोन येऊ लागले. त्यांनीच मला कॉलर ट्यून संबंधी सांगितलं. हा मेसेज हिंदीतच नाही तर इतर भाषांमध्येही रेकॉर्ड करण्यात आला आहे. हा आवाज लोक अनेक दिवसांपासून दिवसातून कित्येकदा ऐकतात. सुरुवातीला अनेकांनी या कॉलर ट्यूनवर जोक्स बनविले. नंतर आता या कॉलर ट्यूनची लोकांना सवय झालेली आहे.echo adrotate_group(5);

echo adrotate_group(9); echo adrotate_group(1);