majlagaon murder

विवाहितेचा कुकर डोक्यात घालून खून

क्राईम न्यूज ऑफ द डे माजलगाव
 पती स्वतःहुन झाला पोलीसात हजर
माजलगाव : शहरापासुन जवळच असलेल्या भाटवडगाव येथील रामेश्वर प्रकाश तौर याने त्याची पत्नी सारिका तौर (वय २४ वर्षे ) हिच्या डोक्यात शनिवारी रात्री १२ वाजता जेवत असताना दोघात वाद होऊन त्यांने पत्नीच्या डोक्यात कुकर घातल्याने ती जागीच मृत्यु झाला. या नंतर तिचा पती  स्वतःहुन शहर पोलीस ठाण्यात हजर होऊन पत्नीने आत्महत्या केल्याचे सांगत होता. परंतु पोलीसांनी घटनेची माहिती घेत खुनाचा गुन्हा दाखल केला.
          येथील व्यापारी अशोक सक्राते यांच्या सारिका या मुलीचा चार वर्षांपूर्वी रामेश्वर तौर याच्याशी विवाह झाला होता. हे दाम्पत्य शहरानजिक असलेल्या भाटवडगांव वस्तीत  त्यांच्या कुटूंबासह राहतात. शनिवारी दि.२१ रात्री१२ वाजण्याच्या दरम्याण तो जेवन करत असताना त्याचे त्याची पत्नी सारिका  हिच्यासोबत कडाक्याचे भांडण झाले. यातच रामेश्वर ने रागाच्या भरात  सारीकाच्या डोक्यात कुकरचे भांडे मारल्याने तीचा जागीच मृत्यु झाला  परंतू रामेश्‍वरने खून पचवण्याच्या उद्देशाने पत्नी सारीकाने ओढणीने गळफास घेतल्याचा बनाव केला. यावर त्याने शहरातील एका खाजगी हॉस्पिटल येथे आणले, परंतू डॉक्टरांने तीचा मृत्य झाल्याचे सांगून पोलिसांना याबाबत कळवले. पत्नीचा मृत्यु झाल्याचे कळताच रामेश्वर स्वतःहुन शहर पोलीस ठाण्यात आला व पत्नीने आत्महत्या केल्याचे सांगितले. त्यानंतर पोलिसांनी घटना स्थळाची पाहणी करून पंचनामा केला व  ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन केले.यावेळी सारिकाच्या डोक्यात मार असल्याचे दिसून आले. त्यामुळे हा प्रकार वेगळाच असल्याचे पोलिसांना लक्षात आला. सारिकाचे वडील अशोक संक्राते यांच्या फिर्यादीवरून माजलगाव शहर पोलिसात पैश्याची वारंवार मागणी केल्याप्रकरणी व खुणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश राठोड हेेे करत आहेत.
कार्यारंभ आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@karyarambhbeed) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Tagged