देश विदेश

जगन्नाथ यात्रेला सर्वोच्च न्यायालयाची सशर्त परवानगी

By Karyarambh Team

June 22, 2020

echo adrotate_group(3);

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जगन्नाथ यात्रा स्थगित करण्यात आली होतीecho adrotate_group(7);

दिल्ली: गेल्या 284 वर्षात कधीही जगन्नाथ यात्रा रद्द करण्यात आलेली नाही. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रादूर्भाव होण्याची शक्यता असल्याने जगन्नाथ यात्रा स्थगित करण्यात आली होती. ओडिशामधील प्रसिद्ध जगन्नाथ रथयात्रेला सर्वोच्च न्यायालयाने परवानगी दिली आहे. आरोग्य मंत्रालयाच्या नियमांचं योग्य पालन करुनच ही रथयात्रा पार पडली पाहिजे असं सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केलं आहे. 13 व्या शतकात या रथयात्रेला सुरुवात झाली होती असं इतिहासकार सांगतात. echo adrotate_group(8);

यानंतर सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. यावर सुनावणी घेताना सर्वोच्च न्यायालायने परवानगी दिली. उद्या म्हणजेच मंगळवारपासून रथयात्रेला सुरुवात होणार आहे.echo adrotate_group(9);

सर्वोच्च न्यायालयाने परवानगी देताना मंदिर समिती, राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या समन्वयाने ही रथयात्रा पार पडली पाहिजे असं स्पष्ट सांगितलं आहे. तसंच करोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्याशी संबंधित सर्व नियमांचं पालन झालं पाहिजे असंही सांगितलं आहे.न्यायमूर्ती अरुण मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोरील सुनावणीत सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी सरकारची बाजू मांडली.

यावेळी त्यांनी इतक्या शतकांची परंपरा थांबवली जाऊ शकत नाही. करोडो लोकांच्या श्रद्धेचा हा विषय आहे. जर भगवान जगन्नाथ उद्या येऊ शकले नाही, तर परंपरेप्रमाणे पुढील 12 वर्ष ते येऊ शकत नाहीत असं सांगितलं. म्हणुन न्यायालयाने आरोग्य मंत्रालयाच्या नियमांचं योग्य पालन करुनच ही रथयात्रा पार पडली पाहिजे असं सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केलं आहे echo adrotate_group(1);