क्राईम

पोषण आहार घेऊन जाणारा ट्रक पलटी

By Karyarambh Team

June 22, 2020

चालकासह एकजण जखमी शिरुर :  तालुक्यातील रायमोहा नजीक अंगणवाडीचा पोषण आहार घेऊन जाणारा ट्रक पलटी झाला. यामध्ये ट्रक हा रोडच्या कडेला खदानीत पडला आहे. यामध्ये चालक, किन्नर दोघेही गंभीर जखमी झाले आहेत. घटनास्थळी रायमोहा चौकीचे गर्जे व पोना.माने यांनी भेट देत जखमींना रुग्णालयात हलविले आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहीतीनुसार परळीहून अंगणवाडी पोषण आहार घेऊन एक ट्रक (एमएच-16 एफसी-2711) रायमोहा येथील पेट्रोल पंंपवर उभा होता. सदरील ट्रक रायमोहा गावात न नेता शिरुरच्या दिशेने घेतला. परंतु गाडीवरील ताबा सुटल्याने ट्रक हा खदानीत जाऊन पडला. यावेळी ट्रकमधील चालक, किन्नर हे दोघेही जखमी झाले. जखमींना तात्काळ रायमोहा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. येथे प्राथमिक उपचार करुन त्यांना पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे.