धार्मिक कार्यक्रमांना परवानगी देऊ नये, जागतिक आरोग्य संघटनेचा इशारा

देश विदेश न्यूज ऑफ द डे

दिल्लीः कोरोना या जागतिक महामारीत अनेक देश कोरोनाचा प्रसार रोखण्यात यशस्वी होत आहेत मात्र, धार्मिक कार्यक्रमामध्ये होणारी गर्दी आता कोरोनाच्या प्रसाराला कारणीभूत ठरत आहे असं समोर आलं आहे. अनेक ठिकाणी जाहीरपणे तर काही ठिकाणी नाईट क्लब किंवा बंद ठिकाणी हे कार्यक्रम पार पडत असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेने सांगितलं आहे.

करोनाला रोखण्यात यशस्वी ठरलेल्या दक्षिण कोरियात करोनाची दुसरी लाट आली आहे. जागतिक आरोग्य संघटनेने दक्षिण कोरियाचा उल्लेख करताना अनेक देशांनी संसर्ग रोखण्यात यश मिळवलं होतं, पण लोक संपर्कात येणं पुन्हा सुरु झालं असल्याने रुग्णांमध्ये वाढ झाल्याचं दिसत आहे. करोना विषाणूंना संधी मिळेल तिथे लगेच फैलाव होणार असं सांगताना जागतिक आरोग्य संघटनेने समूह संसर्ग रोखण्यासाठी शक्य ते सर्व करा असं आवाहन सर्व देशांना केलं आहे.

Tagged