पैठणमध्ये वृद्ध महिलेस कोरोनाची लागण

न्यूज ऑफ द डे

पैठण : शहरातील एक 73 वर्षीय महिला कोरोनाग्रस्त आढळून आली असून तिच्या संपर्कातील 11 जण क्वारंटाइन केले आहेत, अशी माहिती मुख्याधिकारी सोमनाथ जाधव यांनी दिली आहे.

शहरातील एका 73 वर्षीय महिलेला दोन दिवसापूर्वी सतत ताप येत असल्याने एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र त्यांना अधिक त्रास होत असल्याने त्यांच्या नातेवाईकांनी तात्काळ औरंगाबाद येथील एका खाजगी रुग्णालयात उपचार घेण्यासाठी दाखल केले होते. यादरम्यान त्यांचा रिपोर्ट कोरोनाबाधित आल्यामुळे तात्काळ तालुका आरोग्य अधिकारी डॉ.विजय वाघ, नगर परिषद मुख्याधिकारी सोमनाथ जाधव यांनी सदरील रुग्ण महिलेच्या नातेवाईकांची भेट घेऊन संपर्कात आलेल्या इतर व्यक्तींची तपासणी करण्याच्या सूचना देऊन नगरपरिषद कर्मचार्‍यांच्यावतीने या परिसरात निर्जंतुकीकरण मोहीम हाती घेण्यात आली आहे. सदरील महिलेवर औरंगाबाद येथे उपचार सुरू आहे. त्यामुळे नागरिकांनी कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवूनही असे आवाहन तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी केले आहे.

Tagged