महाराष्ट्र

बीडचा निवडणूक खर्च घोटाळा; अहवाल आयुक्तांकडून निवडणूक आयोगाकडे

By Karyarambh Team

June 23, 2020

बीड : राज्यभरात गाजलेल्या बीडच्या निवडणूक खर्चातील अनियमितता आणि घोटाळ्याचा सात सदस्यीय समितीने दिलेला अहवाल विभागीय आयुक्तांकडून आता निवडणूक आयोगाकडे सादर करण्यात आला आहे.

जिल्ह्याच्या निवडणूक विभागाने अव्वाच्या सव्वा बिले आकारून कोट्यावधींचा खर्च केला होता. 9 कोटींचा मंडप, 55 लाखांचे स्टेशनरी साहित्य अशा विविध प्रकारच्या अनियमितता चर्चे राहिल्या. यात उपजिल्हाधिकारी प्रवीण धरमकर हे संशयात भोवर्‍यात होते. परंतु त्यांनी चौकशीला पूर्णत सहकार्य केले. निवडणूक आयोगाच्या आदेशावरुन विभागीय आयुक्तांनी नियुक्त केलेल्या सात सदस्यीय समितीने अहवाल तयार करुन तो निवडणूक आयोगासमोर सादर केला आहे. यात अ‍ॅड.अजित देशमुख आणि सादेक इनामदार हे तक्रारदार होते.