मनोरंजन

ते रहस्य तुझ्यासोबतच निघून गेलं; ‘या’ अभिनेत्रीने सुशांतसाठी लिहिली पोस्ट

By Karyarambh Team

June 23, 2020

नवी दिल्ली | सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येनंतर संपूर्ण बॉलिवूड हळहळलंय. अभिनेत्री भूमिका चावलाने सुशांत गेल्यानंतर एक आठवड्याने सुशांतच्या आठवणींना उजाळा दिला आहे.

भूमिकाने इन्स्टाग्रामवर भावनिक पोस्ट लिहित ‘ते’ रहस्या तुझ्यासोबत गेलं’ असं म्हटलंय.भूमिकाने एम एस धोनी- द अनटोल्ड स्टोरी सिनेमामध्ये धोनीच्या बहिणीची भूमिका केली होती. भूमिका तिच्या पोस्टमध्ये लिहिते, ‘प्रिय सुशांत, तू जिथेही आहेस देवाच्या सहवासात असशील. तू जाऊन एक आठवडा झाला. पण कशामुळे तू आत्महत्या केलीस, ते रहस्य तुझ्यासोबतच निघून गेलं. तुझ्यासोबच नेहमी असणाऱ्यांना लोकांना मी विनंती करते त्यांनी स्वत:ची काळजी घ्यावी”

तुझ्या आत्महत्येनंतर खूप चर्चा सुरू आहेत. अनेकजण एकमेकांची उणीधुणी काढताय. शिवाय या प्रकरणाला जबाबदार कोण, बॉलिवूडने हे सर्व केलं का, नात्यांमुळे हे घडलं का असे बरेच प्रश्न आहेत. परंतु यावरील उपाय इंडस्ट्रीलाच काढू द्या, असंही भूमिकाने पोस्टमध्ये नमूद केलंय