क्राईम

निंदनीय कृत्याने देश हादरला, विरोध केला म्हणुन 14 वर्षीय मुलीला जीवंत जाळले

By Karyarambh Team

June 25, 2020

बलात्काराला विरोध केला म्हणून केले असे कृत्य

बेमेतारा (छत्तीसगड) ः देशामध्ये वरचेवर महिलांवरील अत्याचार, बलात्कार असे निंदनीय प्रकार घडत असताना पुन्हा एकदा महिला सुरक्षेचा विषय ऐरणीवर आला आहे.

सातवीच्या वर्गात शिकणार्‍या एका 14 वर्षीय मुलीने बलात्काराचा प्रयत्न यशस्वी होऊ न दिल्याने तिच्याच शाळेतील दोन विद्यार्थ्यांनी तिला पेटवून दिल्याचा धक्कादायक प्रकार छत्तीसगडमधील बेमेतोरा येथे घडला आहे. पीडित मुलगी 80 टक्के भाजल्याने उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. आरोपी पीडित विद्यार्थ्यीनीच्या शाळेतीलच वरच्या वर्गातील विद्यार्थी आहेत. यातील एक अल्पवयीन असल्याचं सांगण्यात येत आहे.

काय आहे नेमका प्रकार?बेमेतारा जिल्ह्यातील पोलीस अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार, या महिन्याच्या 22 तारखेला जिल्ह्यातील दाढी पोलीस स्टेशन भागात दोन आरोपींनी पीडितेच्या घराजवळच तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. तिने त्यांना चोख उत्तर दिलं आणि पळ काढला. पण यावेळी आरोपींनी पीडितेवर तेल ओतून तिला जीवंत जाळण्याचा प्रयत्न केला. या घटनेनंतर पीडितेला तात्काळ स्थानिक रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं पण बुधवारी उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. मृत्यूपूर्वी पीडित मुलीने गावातील दोन तरुणांनी तिच्यावर बलात्काराचा प्रयत्न केल्याची माहिती पोलिसांना दिली आहे. या प्रकरणात दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आलं असून त्यांची कसून चौकशी सुरू आहे.