SCHOOL

करिअर

सीबीएसई व आयसीएसईच्या दहावी, बारावीच्या परीक्षांबद्दल निर्णय झाला

By Karyarambh Team

June 25, 2020

echo adrotate_group(3);

मुंबईः कोरोनाच्या बिकट संकटामुळे सगळ्या गोष्टी एकदमच ठप्प झाल्या होत्या, शैक्षणिक क्षेत्राला देखील याचा मोठा तोटा झाला. विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्न निर्माण झाला. अनेक मोठ्या अभ्यासक्रमाच्या परिक्षा देखील या काळात रद्द झाल्या. सीबीएसई व आयसीएसई च्या दहावी, बारावीच्या परिक्षांबद्दल राज्य सरकार काय निर्णय घेते याकडे सगळ्यांचं लक्ष लागुन राहिलं होतं.echo adrotate_group(7);

सीबीएसई बोर्डानं दहावी-बारावीच्या परीक्षा 1 ते 15 जुलैदरम्यान घेण्याचे निश्चित केलं होतं. मात्र, परिस्थितीत सुधारणा होत नसल्याच्या पार्श्वभूमीवर परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला.1 ते 15 जुलै दरम्यान घेण्यात येणार्‍या परीक्षा रद्द करण्यात आल्या असून, विद्यार्थ्यांना मागील तीन वर्गात मिळालेल्या गुणांचं मूल्यमापन करून मूल्यमापन केलं जाणार आहे. तसेच ज्या विद्यार्थ्यांचं मंडळानं दिलेल्या गुणांवर समाधान होणार नाही, त्यांनी नंतर बोर्डाकडून घेण्यात येणार्‍या परीक्षा देऊ शकतात. केंद्राचे महाधिवक्ता तुषार मेहता यांनी सर्वोच्च न्यायालयात ही माहिती दिली.echo adrotate_group(8);

दिल्ली, महाराष्ट्र व तामिळनाडू या राज्यांनी सीबीएसई बोर्डाच्या परीक्षा घेण्यासंदर्भात असमर्थता दर्शविली होती, असं तुषार मेहता यांनी सांगितलं. त्यावर सीबीएसईनं बारावीच्या परीक्षेसंदर्भात नव्यानं सूचना जारी करावी, तसेच राज्य मंडळांच्या परीक्षांच्या स्थितीसंदर्भातही उत्तर दाखल करावे, असे आदेश सर्वोच्च न्यायालयानं दिले आहेत. या याचिकेवर उद्या पुन्हा सुनावणी होणार आहे.echo adrotate_group(9);

दोन पर्याय खूलेविद्यार्थ्यांना अतंर्गत मूल्यांकनावरून दिलेला निकाल स्वीकारणं किंवा सर्व परिस्थिती सुरळीत झाल्यावर पुन्हा परीक्षा देणं हे दोन पर्याय असल्याचंही सीबीएसईमार्फत स्पष्ट करण्यात आलंय. echo adrotate_group(10);