chandrayan mission 3

देश विदेश

चांद्रयान 3: जाधवपुरच्या दोन संशोधकांवर सॉफ्ट लॅन्डींगचं आव्हान

By Karyarambh Team

June 25, 2020

echo adrotate_group(3);

echo adrotate_group(7);

चांद्रयान 2 च्यावेळी भारताला सॉफ्ट लॅन्डींग मध्ये यश येईल अशी आशा असताना ती मोहिम अयशस्वी झाली. आतापर्यंतच्या चंद्र मोहिमांमध्ये चंद्राच्या दक्षिण ध्रुवाचा कोणीही अभ्यास केलेला नाही. त्याचाच अभ्यास करण्याचा प्रयत्न चांद्रयान 2 या मोहिमेदरम्यान झाला होता.echo adrotate_group(8);

भारतीय अवकाश संशोधन संस्था इस्रोने चांद्रयान 3 ची तयारी सुरु केली आहे. जाधवपूर विद्यापीठाचे दोन संशोधक इस्रोच्या चांद्रयान 3 मोहिमेत चंद्रावरील सॉफ्ट लँडिंगच्या प्रोजेक्टवर काम करत आहेत. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वी लँडिंग करण्याचा भारताचा संकल्प आहे.echo adrotate_group(9);

जाधवपूर विद्यापीठाचे दोन संशोधक सयान चॅटर्जी, डॉ. अमितवा गुप्ता इस्रोसोबत चंद्रावरील लँडिंगच्या प्रोजेक्टवर काम करत आहेत. पीटीआयने हे वृत्त दिले आहे. चंद्रावरील प्रत्यक्ष लँडिंगच्यावेळी कशी स्थिती असेल तो विचार करुन सिम्युलेशन मॉडेलवर ते काम करत आहेत. लँडरचे चंद्राच्या पृष्ठभागावर क्रॅश लँडिंग न होता, पंखाप्रमाणे सॉफ्ट लँडिंग कसे होईल, त्यावर काम सुरु आहे असे सयान चॅटर्जी यांनी सांगितले. ते इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन सहाय्यक प्राध्यापक आहेत.

खासगी क्षेत्राला सुद्धा आता इस्रोच्या मोहिमांचा भाग होता येईलइस्रोने अवकाश संशोधन क्षेत्र खासगी कंपन्यांसाठी खुले केले आहे. खासगी क्षेत्राला आता उपग्रह निर्मितीसह रॉकेट बांधणी तसेच उपग्रह लाँचिंगच्या सेवाही सुरु करता येऊ शकतात. भारतीय अवकाश संशोधन संस्था इस्रोचे प्रमुख के.सिवन यांनी आज ही माहिती दिली. खासगी क्षेत्राला सुद्धा आता इस्रोच्या मोहिमांचा भाग होता येईल असे त्यांनी सांगितले. echo adrotate_group(1);