dhananjay-munde

धनंजय मुंडेंचे भावनिक शब्द, ‘बहिणीचा आजारपणात फोन आला याचा आनंद वाटला!’

न्यूज ऑफ द डे मराठवाडा महाराष्ट्र राजकारण

मुंबईः राज्याचे सामजिक न्यायमंत्री धनजंय मुंडे यांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली. त्यांना कोरोना झाला हि बीडसह राज्यासाठी धक्कादायक बाब होती. कोरोनावर उपचार घेण्यासाठी त्यांना मुंबईतील बी्रच कॅन्डी या दवाखाण्यात भरती करण्यात आले होते.

त्यांचा कोरोनाचा अनुभव एका वृत्तवाहिनीला सांगताना त्यांनी पंकजाताई मुंडे यांचा तब्येतीची चौकशी करण्यासाठी फोन आला याचा मनापासुन आनंद वाटला असे उद्गार काढले. आमच्यात संघर्ष झाला, कुटुंबात दोन राजकीय विचारधारा आल्या. माझ्या आजारपणाच्या काळात बहिणीने फोन केला, सदिच्छा व्यक्त केली, याचा आनंद वाटला अशा शब्दात आनंद व्यक्त केला.

त्यांना कोरोना झाल्यानंतर पहिली काळजी हीच होती की कुटुंबाला कोरोनाची लागण झाली नसेल ना? मुली समजूतदार आहेत. त्यांनी समजून घेतलं असंही त्यांनी यावेळी नमुद केलं. आपल्याला काही होत नाही, हा आत्मविश्वास नडला असं त्यांनी मान्य केलं आणि जनतेला देखील काळजी घ्या आणि गरज नसेल तर घराबाहेर पडू नका असं आवाहन केलं. कोरोना पॉझिटिव्ह असल्याचा जेव्हा कळलं, तेव्हा आईचा चेहरा पहिल्यांदा समोर आला असंही ते यावेळी बोलले.

माझी प्रकृती आता व्यवस्थित आहे. नियमाप्रमाणे होम क्वॉरन्टाईन आहे. जनतेच्या आशीर्वादाने आणि आई-वडिलांच्या पुण्याईने मला हे जीवन पुन्हा मिळालं. आता मी माझं आयुष्य जनतेच्या सेवेत घालवणार आहे असंही ते यावेळी म्हणाले.

Tagged