न्यूज ऑफ द डे

बीडमधील विप्रनगर कन्टेनमेंट झोन

By Karyarambh Team

June 27, 2020

echo adrotate_group(3);

बीड : शहरातील विप्रनगर येथील कोरोना विषाणूची लागण झालेले रुग्ण आढळून आले आहेत, त्यामुळे संबंधित क्षेत्रात कन्टेनमेंट झोन घोषित करण्यात आले असून फौजदारी प्रकिया दंड सहिंता 1973 चे कलम 144 नुसार पूर्णवेळ संचारबंदी लागू केली आहे असे आदेश जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिले आहेत.echo adrotate_group(6);

विप्रनगर येथील रुग्णास कोरोना विषाणूची लागण झाल्याचे आढळून आले आहे असे औरंगाबाद येथील डॉ. हेडगेवार हॉस्पिटल यांनी कळविले आहे. त्यामुळे जिल्ह्यात इतर ठिकाणी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून बीड शहरातील विप्रनगर येथील श्रीकिसन जेथलिया यांच्या घरापासून ते ज्ञानोबा माऊली मुंडे यांचे घरापर्यंत या परिसरात कन्टेनमेंट झोन घोषित करण्यात आले असून पुढील अनिश्चित कालावधीसाठी पूर्णवेळ बंद करण्यात येवून संचार बंदी लागू करण्यात आली आहे. राज्य शासनाने लॉकडाऊनचा कालावधी 30 जून 2020 पर्यंत वाढविला असल्याने त्याअनुषगाने जिल्ह्यात दिनांक 30 जून 2020 रोजीचे रात्री 12 पर्यंत फौजदारी प्रक्रिया दंड संहिताचे कलम 144 (1)(3) लागू करण्यात आले आहेत. तसेच यापूर्वी या कार्यालयाने वेळोवेळी निर्गमित केलेले आदेश, सुधारीत आदेश, सुधारणा आदेश या आदेशासह अंमलात राहतील.echo adrotate_group(5); echo adrotate_group(10);echo adrotate_group(9);