beed-civil-borad

बीड जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची आजची स्थिती?

न्यूज ऑफ द डे बीड

बीड : जिल्ह्यातील कोरोना रुग्णांचा corona possitive आकडा शंभरी पार गेलेला असताना कोरोनामुक्त झालेल्यांचा आकडा देखील 80 च्या घरात आहे. त्यामुळे जिल्हावासियांना मोठा दिलासा मिळाला आहे.

जिल्ह्यात beed आजपर्यंत जिल्ह्यातील 111 व परजिल्ह्यातील 8 अशी एकूण 119 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. यात जिल्ह्यात तिघांचा तर परजिल्ह्यात एकाचा अशा चौघांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय कोरोनामुक्त corona free झालेल्या 88 जणात परजिल्ह्यातील 6 जणांचा समावेश आहे. उपचाराखालील रुग्ण संख्या 20 असून एक जण परजिल्ह्यातील आहे. नोंदीनुसार उपचाराखालील रुग्णात बीड beed तालुक्यात सर्वाधिक 14 रुग्ण त्यापाठोपाठ पाटोद्यात patoda चार तर धारुरमध्ये dharur दोन रुग्णांचा समावेश आहे. दरम्यान, जिल्ह्यातील कोरोना रुग्णांचा बरा होणार्‍यांचा आकडा वाढत असला तरी नागरिकांनी गर्दी टाळण्याचे, नियामांचे पालन करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून वांरवार करण्यात येत आहे.
आज दोघांना मिळणार सुटी discharge
जिल्ह्यातील आज दोन रुग्णांना सुटी मिळणार असून रुग्ण आता कोरोनामुक्त होत असल्याने जिल्हावासियांना दिलासा मिळत आहे.

Tagged