अंबाजोगाई

घरफोड्या करणारे दोन अट्टल चोरटे गजाआड

By Keshav Kadam

June 28, 2020

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

बीड : सतत घरफोड्या करणार्‍या दोन अट्टल चोरट्यांच्या स्थानिक गुन्हे शाखेने मुसक्या आवळल्या आहेत. त्यांच्याकडून सोन्या चांदीच्या दागिण्यासह इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे. 

     आमरीस उर्फ अमर्‍या शिंदे (वय 22), संजय शंकर जाधव (वय 40 दोघे रा.कौठळी तांडा ता.परळी) असे पकडलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांनी परळी तालुक्यातील तंडोळी तांडा येथील विनायक बाबुराव जाधव यांच्या घरी गुप्ता सिदबा भोसले, मिना राजु भासले, संजय शंकर जाधव यांच्या मदतीने घरफोडी केली होती. यावेळी सोन्या चांदीच्या दागिण्यासह मुद्देमाल लंपास केला होता. या प्रकरणी परळी ग्रामीण पोलीसात अज्ञातावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेने तपासाची चक्रे गतीमान करत आमरीस व संजय यांना ताब्यात घेवून चौकशी केली. यावेळी त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. यावेळी त्यांच्याकडून 1 लाख 62 हजार 850 रुपये किमतीचे सोन्याचे दागिणे व चोरीला गेलेला मोबाईल जप्त करण्यात आला. तर अधिक माल हा भगवान रामा चव्हाण यास विक्रीसाठी दिला असल्याचे सांगितले. आरोपींना पुढील तपासासाठी परळी ग्रामीण पोलीसांच्या स्वाधीन करण्यात आले. ही कारवाई पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार, अप्पर पोलीस अधीक्षक विजय कबाडे, स्वाती भोर, उपविभागीय आधिकारी राहुल धस, स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि.भरत राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि.गोविंद एकीलवादे, पोह.तुळशीराम जगताप, मुंजाबा कुवारे, भास्कर केंद्रे, बालाजी दराडे, सलीम शेख, पोना.विकास वाघमारे, विकी सुरवसे, अन्वर शेख, मपोना.जाधवर, पोकॉ.हरके यांनी केली.