न्यूज ऑफ द डे

३० जूननंतरही लॉकडाऊन उठणार नाही

By Karyarambh Team

June 28, 2020

मुंबई : आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेशी संवाद साधला. राज्यात लॉकडाऊनदरम्यान, शिथिलता दिल्यामुळे कोरोनाचा कहर मोठ्या प्रमाणात वाढला. त्यामुळे लॉकडाऊनमध्ये सूट देणं योग्य नाही असं उद्धव ठाकरे म्हणाले आहे. अशात राज्यातला लॉकडाऊन ३० जून नंतरही उठवण्यात येणार नसल्याची घोषणा उद्धव ठाकरे यांनी केली आहे.

   राज्य अनलॉक होत असताना अनेक दुकानं आणि व्यवसाय सुरू होत आहे. पण त्यामुळे अत्यावश्यक सेवा वगळता कोणीही बाहेर पडून नका असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं आहे. यावेळी आपण शेतकऱ्यांच्या मागे खंबीर उभं राहणार असल्याचं आश्वासन उद्धव ठाकरे यांनी दिलं. दरम्यान, शेतकऱ्यांना फसवणाऱ्या बियाणे, खते कंपन्यांवर कारवाई करणार असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले.