पंढरपुर

न्यूज ऑफ द डे

पंढरपुरात 2 जुलैपर्यंत संचारबंदी लागू

By Karyarambh Team

June 29, 2020

echo adrotate_group(3);

उद्या दुपारपासुन लागू होणार आदेशecho adrotate_group(6);

पंढरपुर ः आषाढी एकादशीच्या अनुशंगाने पंढरपुरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणुन उद्या दुपारपासुन 2 जुलैपर्यंत संचारबंदी लागू केली जाणार आहे. आषाढी वारी अखेरच्या टप्प्यात आहे. 1 तारखेला आषाढी एकादशी आहे. परंतु कोरोनामुळे कोणालाही पंढरपुरात प्रवेश दिला जात नाही. सोलापूर जिल्ह्याचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांनी ही माहिती दिली आहे. आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाने शहरात संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.echo adrotate_group(8);

आषाढी एकादशीच्या निमित्ताने वारीच्या माध्यमातून दरवर्षी 12 ते 15 लाख वारकरी पंढरपुरात येतात. परंतु यंदा कोविडच्या पार्श्वभूमीवर ठरवून दिलेल्या मानाच्या पालख्यांनाच शहरात प्रवेश दिला जाणार आहे. नाकाबंदीही केलेली आहे. गर्दी होऊ नये यासाठी 29 जून ते 2 जुलैपर्यंत संचारबंदीचा प्रस्ताव ठेवला होता. परंतु व्यापारी आणि लोकप्रतिनिधींसोबत चर्चा करुन 30 जून रोजी दुपारी दोन वाजल्यापासून 2 जुलैपर्यंत संचारबंदीचा नवीन प्रस्ताव मान्य केला आहे. अशीही माहिती त्यांनी दिली.echo adrotate_group(9);

या संचारबंदीत सर्व अत्यावश्यक सेवांना सूट देण्यात आली आहें. तसंच परवानगी असलेल्या पास धारकांना, पोलीस अधिकारी, कर्मचार्‍यांना यांनाही संचारबंदीत सूट असेल. echo adrotate_group(10);