AHAMADNAGAR MAHA NAGAR PALIKA

इकडे कोरोना ‘आ’ वासून होता अन् तिकडे अधिकारी गूल खेळत होते

न्यूज ऑफ द डे पश्चिम महाराष्ट्र महाराष्ट्र

 

मुलाच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल

नगर, दि. 29 : कोरोना काळात एकीकडे आरोग्य व्यवस्थेचं कौतूक होत असताना इकडे नगर जिल्ह्यात मात्र एक वेगळाच प्रकार उघडकीस आला. महानगर पालिकेचे आरोग्य अधिकारी आणि अन्य कर्मचारी अनैतिक संबंधांमध्ये इतके डुबून गेले की त्यांनी चक्क 14 वर्षीय मुलाला गच्चीवरून खाली फेकून देण्याचा प्रयत्न केला. रविवारी त्या मुलाने दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा नोंद झाला आहे.

मुलाने दिलेल्या म्हटले आहे, की 13 जून रोजी रात्री साडेअकरा वाजता घरातून मोठ्याने आवाज ऐकू येत होते. त्यामुळे मी जागा झालो. त्याचवेळी मनपाचे आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बोरगे, मिसाळ व आई खुर्चीवर बसले होते. घाटविसावे हाही तेथेच होता. दारुच्या चार बाटल्या आणि मटणाच्या जेवणाची चार ताटे लावली होती. तुम्ही इथे काय करता असे विचारले असताना डॉ. बोरगे याने बूट काढून मारला. त्यामुळे मी गच्चीवर जावून बसलो असता तेथेही चौघे आले आणि शंकर मिसाळ याने मला धक्काबुक्की केली. तसेच डॉ. बोरगे व मिसाळ यांनी जीवे मारण्याची धमकी देत गच्चीवरून ढकलून देण्याचा प्रयत्न केला. एका अधिकार्‍याचे आईशी अनैतिक संबंध असल्याने तीही विरोध करीत नव्हती. मी विरोध केला असता मला मारहाण करून जिवे मारण्याची धमकी संबंधित लोकांनी दिली. तसेच यापूर्वीही या लोकांनी माझ्या हाताला शिगारेटचे चटके दिलले असल्याचे त्याने फिर्यादीत म्हटले आहे. त्यावरून तोफखाना पोलीसांनी महापालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बोरगे, अग्निशमन विभागप्रमुख शंकर मिसाळ, बाळू घाटविसावे व अजून एक संशयित महिलेच्या विरोधात तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

Tagged