corona symptoms

देश विदेश

आता कोरोनाच्या रुग्णसंख्येबरोबरच लक्षणांमध्येही वाढ

By Karyarambh Team

June 29, 2020

मुंबई: कोरोनाने अख्ख्या जगाला जेरीस आणले आहे. भारतामध्येही कोरोनाग्रस्तांची संख्या झपाट्याने वाढत आहे. रुग्णसंख्येबरोबरच आता नवनवीन लक्षणं देखील समोर येताना दिसत आहेत.

आतापर्यंत ताप, श्वास घेण्यास त्रास, कोरडा खोकला, थकवा ही कोरोनाची लक्षणे समजली जात होती. आता कोरोना व्हायरसवर संशोधन करणार्‍या अमेरिकेतील सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशन या मेडिकल संस्थेने तीन नवीन लक्षणे कोराना व्हायरसचे संभाव्य संकेत मान्य केले आहेत. आता एकुण 11 लक्षणे समोर आली आहेत. त्यातील तीन नवी लक्षणे पुढीलप्रमाणे आहेत.

नाक वाहणेसीडीसीच्या मते, जर एखाद्या व्यक्तीचं ना सातत्याने वाहत असेल आणि त्याला अस्वस्थ वाटत असेल, शिवाय ताप नसेल तरीही अशा व्यक्तीने कोरोनाची चाचणी करायला हवी. त्या व्यक्तीला कोरोनाची लागण झाली असावी.

मळमळ होणेमळमळ होणं हे कोरोनाचं आणखी एक लक्षण असल्याचं अमेरिकेच्या सीडीसी या संस्थेने म्हटलं आहे. जर एखाद्या व्यक्तीला वारंवार मळमळ होत असेल किंवा उलटीसारखं वाटत असेल तर ही धोक्याची घंटा असू शकते. अशा व्यक्तीने तातडीने स्वत: विलग करायला हवं. मात्र मळमळ होण्याची इतर कारणंही असू शकतात. परंतु सध्याच्या परिस्थितीत त्याकडे दुर्लक्ष करु नये. सातत्याने असं होत असल्यास कोरोनाची चाचणी करायला हवी.

अतिसारकोरोना तिसरं नवं लक्षण म्हणजे अतिसार. डॉक्टरांनी याआधीही मान्य केलं होतं की कोरोनाबाधित रुग्णांमध्ये अतिसारासारखे मिळतेजुळते लक्षणे असतात. आता सीडीसीनेही मान्य केलं आहे की, जगभरात मोठ्या प्रमाणात कोरोनाग्रस्त रुग्णांमध्ये अतिसाराचे लक्षणे आढळले आहेत.