TikTok, Helo सह 59 चायनीज मोबाईल अ‍ॅपवर बंदी

क्राईम देश विदेश न्यूज ऑफ द डे

नवी दिल्ली : देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने धोकादायक ठरण्याची शक्यता असलेली 59 चायनीज मोबाईल अ‍ॅपवर बंदी घालायचा मोठा निर्णय मोदी सरकारने घेतला आहे. TikTok आणि Helo या लोकप्रिय अ‍ॅप्सचा यात समावेश आहे.

    देशाच्या माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालयाने कलम 69-च्या अंतर्गत ही बंदी घातली आहे. चीनकडून सायबर अटॅकची भीती गेले काही दिवस व्यक्त करण्यात येत होती. त्यावर उपाय म्हणून या चिनी अ‍ॅप्सवर बंधनं नव्हे तर बंदीच घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. देशवासीयांची सायबर स्पेस सुरक्षित राहावी, यासाठी हा निर्णय घेत असल्याचं सांगण्यात आलं आहे. या 59 अ‍ॅप्सवर बंदी घालण्यात आली आहे. त्याचबरोबर मोबाईल अ‍ॅप्स आणि इंटरनेट वापरताना कोणती काळजी घ्यावी, डाऊनलोड करताना कुठली माहिती द्यावी याबाबत भारत सरकारने निवेदन जारी केलं आहे. मालवेअर आणि शंकास्पद अ‍ॅप्सची यादीसुद्धा जाहीर करण्यात आली आहे. ही अ‍ॅप्स डाऊनलोड करू नये, असा इशारा देण्यात आला आहे.

ही आहे बंद असलेल्या अ‍ॅप्सची यादी
TikTok, Shareit, Kwai, UC Browser, Baidu map, Shein, Clash of Kings, DU battery saver, Helo, Likee, YouCam makeup, Mi Community, CM Browers, Virus Cleaner, APUS Browser, ROMWE, Club Factory, Newsdog, Beutry Plus, WeChat, UC News, QQ Mail, Weibo, Xender, QQ Music, QQ Newsfeed, Bigo Live, SelfieCity, Mail Master, Parallel Space

Tagged