देश विदेश

अखेर प्ले स्टोअरवरून टिकटॉक हटवले, पण..

By Karyarambh Team

June 30, 2020

echo adrotate_group(3);

दिल्ली : देशाच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होत असल्यामुळे 59 चिनी अ‍ॅपवर china app बंदी ban घालण्याचा निर्णय केंद्र सरकारने central goveronment सोमवारी रात्री जाहीर केला. यात टीकटॉक या अ‍ॅपचा समावेश आहे. त्यामुळे आता प्ले स्टोअरवरुन play stoar हे अ‍ॅप app काढून टाकण्यात आले आहे. त्यामुळे, आता नव्याने टीकटॉक tiktok इन्स्टॉल होऊ शकणार नाही. मात्र, ज्या कोट्यवधी युजर्संने हे अ‍ॅप डाऊनलोड app download केले आहे, त्यांच्या मोबाईलमध्ये हे कार्यरत असल्याचे दिसून येते.echo adrotate_group(7);

केंद्र सरकारने सोमवारी रात्री टीकटॉकसह 59 अ‍ॅपवर बंदी घातल्याच्या निर्णयाची घोषणा केली. त्यानंतर, टीकटॉक युजर्संने tiktok users आपल्या अ‍ॅपवर जाऊन प्रोफाईल पाहिले, अ‍ॅप सुरु आहे की नाही, याचीही खात्री केली. तर, प्ले स्टोअरवरही हे अ‍ॅप उपलब्ध होते. मात्र, सकाळी 9 वाजल्यापासून पाहिल्यानंतर प्ले स्टोअरवर टीकटॉक अ‍ॅप उपलब्ध नसल्याचे दिसते. प्ले स्टोअरवर टीकटॉक टाईप केल्यानंतर, संबंधित इतर अ‍ॅप दिसून येतात. मात्र, सोशल मीडियावरील लोकप्रिय टीकटॉक अ‍ॅप दिसून येत नाही. प्ले स्टोअरवरुन अखेर हे अ‍ॅप बंद करण्यात आले आहे. तरी, ज्या युजर्संने यापूर्वी ते अ‍ॅप डाऊनलोड केले आहे, ते युजर्स सध्या अ‍ॅपचा वापर करत असून या कंपन्यातील कर्मचार्‍यांचे डेली वर्क नेहमीप्रमाणे सुरु आहे.दरम्यान, या अ‍ॅप्समुळे खासगी डेटा व खासगीपण यांच्यावर आक्रमण होत असल्याच्या तक्रारी आहेत. या अ‍ॅप्सना मिळणारी माहिती भारताचे सार्वभौमत्व आणि ऐक्य यांच्या विरोधात वापरली जात असल्याची माहिती मिळाली आहे. या माहितीचा वापर देशाची सुरक्षा व सुव्यवस्था यांच्या विरोधात होत आहे. याशिवाय वैयक्तिक सुरक्षितता देखील धोक्यात असल्याचे एका जगविख्यात संस्थेच्या अहवालात देखील नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे सोशल मीडियावरील टीकटॉक अ‍ॅपसह अशाच काही अ‍ॅपवर बंदी हे देशवासियांच्या हिताचेच आहे.echo adrotate_group(8); echo adrotate_group(10);echo adrotate_group(9);