eknath maharaj palakhi

एकनाथ महाराज पालखी सोहळ्याचे पंढरपुरकडे प्रस्थान

न्यूज ऑफ द डे बीड मराठवाडा

तुका म्हणे धावा !
आहे पंढरी विसावा !!

चंद्रकांत अंबिलवादे/पैठण

दि.30 : श्री संत एकनाथ महाराजांचा पालखी सोहळ्याने आज सकाळी 11 वाजता पंढरपुरकडे प्रस्थान ठेवले. येथील नाथ महाराज यांच्या समाधी मंदिरातून राज्याचे रोजगार हमी योजना मंत्री संदीपान भुमरे, तहसीलदार चंद्रकांत शेळके यांच्या हस्ते आरती करून सोहळ्याचे प्रस्थान करण्यात आले.


यावेळी पालखी प्रमुख ह.भ.प. रघुनाथ महाराज गोसावी पालखीवाले, नाथ मंदिराचे कार्यकारी विश्वस्त दादा पाटील, नगरपरिषदेचे सहाय्यक मुख्याधिकारी अब्दुल सत्तार, रेखाताई कुलकर्णी, योगेश महाराज, गंगाराम राऊत महाराज, नवले महाराज, रवींद्र पांडव, सोहळ्याचे व्यवस्थापक चंद्रकांत अंबिलवादे, सचिन पांडव महालिंग, महाराज उगले, महाराज रवींद्र साळजोशी गुरु, यांच्यासह जनार्धन दराडे, अमोल गव्हाणे, ऋषिकेश महाराज नवले, नामदेव खरात, गणेश मडके, पोलीस निरीक्षक भगीरथ देशमुख, औरंगाबाद चे तहसीलदार लाड, पोलीस उपनिरीक्षक संतोष सानप, महेश भवर, संजय ढोबळे यांची प्रमुख उपस्थिती होती. हा पादुका सोहळा रात्री उशिरा पंढरी नगरीत दाखल होत आहे.

 eknath maharaj palakhi sohala
रोजगार हमी योजना मंत्री संदीपान भुमरे, तहसीलदार चंद्रकांत शेळके यांच्या हस्ते आरती करण्यात आली.
पैठण येथून पालखीचे बसने प्रस्थान ठेवताना
Tagged

2 thoughts on “एकनाथ महाराज पालखी सोहळ्याचे पंढरपुरकडे प्रस्थान

Comments are closed.