कोरोना अपडेट

54 स्वॅब तपासणीसाठी पाठवले

By Karyarambh Team

July 01, 2020

आता फक्त सात रुग्णांवर उपचार सुरु

बीड : जिल्ह्यातील विविध रूग्णालयातून बुधवारी (दि.1) 54 जणांच्या स्वॅबचे नमुने तपासणीसाठी अंबाजोगाई येथील प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत.

यामध्ये बीड जिल्हा रूग्णालयातून 14, कोविड केअर सेंटर 9, आष्टी 12, केज 2, परळी 2, अंबाजोगाई कोविड केअर सेंटर 10 आणि स्वाराती अंबाजोगाई 5 या व्यक्तींच्या स्वॅबचा समावेश आहे. दरम्यान जिल्ह्यामध्ये कोरोना बाधित रूग्णांची संख्या 120+8 (जिल्ह्याबाहेरील) असे 128 आहेत. त्यापैकी 109 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. बुधवारी बीड तालुक्यातील चार रूग्णांना जिल्हा रूग्णालयातुन डिस्चार्ज देण्यात येणार असून आता केवळ 7 रूग्णांवर उपचार सुरु असल्याची माहिती जिल्हा आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.