kartiki gaikwad

न्यूज ऑफ द डे

कार्तिकी गायकवाडचं ठरलं!

By Karyarambh Team

July 05, 2020

रोनित पिसेसोबत 26 जुलैला साखरपुडा

मुंबई, दि. 5 : ‘सा रे ग म प- लिटील चॅम्प्स’ या स्पर्धेचे जेतेपद पटकावणारी कार्तिकी गायकवाड सध्या चर्चेत आहे. या चर्चेचं कारण ठरलंय ते म्हणजे कार्तिकीचा साखरपुडा. आपल्या आवाजाने अवघ्या महाराष्ट्राला मंत्रमुग्ध करणारी कार्तिकीचे आयुष्य आता एका नव्या वळणावर आहे. खुद्द कार्तिकीनेच ही माहिती दिली आहे.

कार्तिकीचा येत्या 26 जुलैला रोनित पिसेसोबत साखरपुडा होणार आहे. काही दिवसांपूर्वीच तिचा पाहण्याचा कार्यक्रम पार पडला आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर हा कार्यक्रम काही मोजक्याच लोकांच्या उपस्थितीमध्ये पार पडला.

कार्तिकीचे वडिल कल्याणजी गायकवाड यांनी मित्रपरिवारात हे लग्न ठरवले आहे. रोनित पिसे हा पुण्याचा राहणारा असून तो इंजिनिअर आहे. लग्नाची तारीख अद्याप काढण्यात आलेली नाही अशी माहिती कार्तिकीने दिली आहे.

कार्तिकी ‘सा रे ग म प- लिटिल चॅम्प्स’ विजेती ठरली होती. तिच्यासोबत आर्या आंबेकर, मुग्धा वैशंपायन, प्रथमेश लघाटे, रोहित राऊत हे स्पर्धक होते. त्यानंतर तिने कलर्स वाहिनीवरील ‘राइझिंग स्टार’ या रिअ‍ॅलिटी शो मध्येही सहभाग घेतला होता.