contenment zone

गेवराई शहराच्या काही भागात पूर्णवेळ संचारबंदी लागू

कोरोना अपडेट गेवराई न्यूज ऑफ द डे

बीड, दि. 5 :– गेवराई शहरातील कोरोना विषाणूची लागण COVID-19 Positive झालेला रुग्ण आढळून आला आहे, त्यामुळेे गेवराई शहरातील कोल्हेर रोड पश्चिमेकडील संजयनगरचा पूर्ण परिसर, ईसलामपुरा, सावतानगर, जुना धोंडराई रोडच्या उत्तरेकडील पूर्ण परिसरात कन्टेनमेंट झोन घोषित करण्यात आले असून फौजदारी प्रकिया दंड सहिंता १९७३ चे कलम १४४ नुसार पूर्णवेळ संचारबंदी लागू केली आहे असे आदेश जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिले आहेत .

गेवराई येथील व्यक्ती अहमदनगर जिल्हा रुग्णालय येथे तपासणीद्वारे कोरोना बाधित झाले असल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे. त्यामुळे जिल्हयात इतर ठिकाणी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून गेवराई शहरातील कोल्हेर रोड पश्चिमेकडील संजयनगरचा पूर्ण परिसर, ईसलामपुरा, सावतानगर, जुना धोंडराई रोडच्या उत्तरेकडील पूर्ण परिसरात कन्टेनमेंट झोन (Containment zone) घोषित करण्यात आले असून पुढील अनिश्चित कालावधीसाठी पूर्णवेळ बंद करण्यात येवून संचार बंदी लागू करण्यात आली आहे .

राज्य शासनाने लॉकडाऊनचा कालावधी ३१ जुलै २०२० पर्यंत वाढविला असल्याने त्याअनुषगाने जिल्ह्यात दिनांक ३१ जुलै २०२० रोजीचे रात्री १२.०० पर्यंत फौजदारी प्रक्रिया दंड संहिताचे कलम १४४ (१)(३) लागू करण्यात आले आहेत. तसेच यापूर्वी या कार्यालयाने वेळोवेळी निर्गमित केलेले आदेश, सुधारीत आदेश, सुधारणा आदेश या आदेशासह अंमलात राहतील.

Tagged