suicide

शेतकर्‍याची गळफास घेऊन आत्महत्या

क्राईम न्यूज ऑफ द डे बीड मराठवाडा

राणा डोईफोडेसह कुटूंबातील सदस्यांवर गुन्हा दाखल

नेकनूर: शेतातील वादावरुन मारहाण केल्यामुळे व सतत होत असलेले त्रासाला कंटाळून डोईफोडवाडी येथील एका शेतकर्‍याने गळफास घेवून आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी (दि.7) सकाळी घडली. या प्रकरणी पाली गटाचे जि.प.सदस्यपती राणा डोईफोडे (RANA DOIFODE) यांच्यासह कुटूंबातील सदस्यांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

      किसनराव धोंडीबा डोईफोडे (वय 52 रा.डोईफोडवाडी ता.जि.बीड) असे आत्महत्या (SUICIDE ) केलेल्या शेतकर्‍याचे नाव आहे. मयताचा मुलगा प्रदिप किसनराव डोईफोडे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, सर्जेराव धोंडीबा डोईफोडे, राणा सर्जेराव डोईफोडे, कालिंदा सर्जेराव डोईफोडे, शितल सर्जेराव डोईफोडे, मनोज सर्जेराव डोईफोडे (सर्व रा.डोईफोडवाडी ता.बीड) यांनी डोईफोडवाडी शिवारातील वडीलोपार्जीत शेत जमीन वाटणी करुन देण्याबाबत व समाईक बोअर सुरु करण्यासाठी गेले असताना वरील आरोपींनी मारहाण करत जिवे मारण्याची धमकी दिली. व त्यांच्या सततच्या होणार्‍या त्रासाल कंटाळून वडीलांनी आत्महत्या केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणी नेकनूर पोलीस ठाण्यात कलम 306,323, 504,506, 34 भादंवि. नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि.लक्ष्मण केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.

Tagged