phool sheti

फुलशेती करणार्‍या शेतकर्‍यांसाठी दिलासादायक बातमी

न्यूज ऑफ द डे शेती

कृषीमंत्री दादा भुसे लवकरच मोठा निर्णय घेण्याची शक्यता

वर्धा : कोरोनामुळे फुलशेतीला जबरदस्त फटका बसला आहे. त्यामुळे फुलशेती करणार्‍या शेतकर्‍यांना सावरण्यासाठी कृषीमंत्री दादा भुसे लवकरच मोठा निर्यण घेण्याची शक्यता आहे. त्यानुसार ते प्लास्टिक फुलांवर बंदी आणण्यासाठी अग्रेसर असल्याची माहिती त्यांनीच वर्धा येथे एका कार्यक्रमात दिली.

वर्धा येथे शेती संदर्भात एका वेबिनार आयोजित करण्यात आला होता. यावेळी भुसे वर्ध्यातून सहभागी झाले होते. प्लास्टिकच्या फुलांवर बंदीच्या दिशेनं लवकरच पाऊलं उचलली जातील, असं भुसे यांनी सांगितलं. कृषीमंत्र्यांनी हा निर्णय घेतल्यास राज्यातील अनेक शेतकर्‍यांना मोठा दिलासा मिळणार आहे. राज्यातून फुलांची निर्यातही होण्याची गरज असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं. यासोबत जिल्हा पातळीवर नर्सरी मॉल उभारून एका छताखाली विवीध फळांची रोपे व फुलांची झाडे आणण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचंही भुसे यांनी सांगितलं.

दरम्यान, सण व उत्सवाच्या काळात ग्राहकांकडून मोठ्या प्रमाणात प्लास्टिकच्या फुलांचा वापर केला जातो. याचा सर्वाधिक फटका फुलशेती करणार्‍या शेतकर्‍यांना बसतो. प्लास्टिकच्या फुलांवर बंदी आणण्याची मागणी गेल्या काही वर्षांपासून सुरू होती. अखेरीस सरकारनं याबाबत सकारात्मक पाऊलं टाकायला आता सुरूवात केली असल्याने शेतकर्‍यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

Tagged