corona

अजुन किमान 6 महिने कोरोनावरील लसीची प्रतिक्षा

कोरोना अपडेट देश विदेश न्यूज ऑफ द डे महाराष्ट्र

सीरम इन्स्टीट्युटचे अदर पुनावाला यांची माहिती

पुणे ः कोरोनाच्या लसीवर अनेक बातम्या येत आहेत. अनेक जण लस लवकर येणार असा दावा करत आहेत मात्र सर्वात जास्त चर्चा हि सीरम इन्स्टीट्युटच्या ऑक्सफर्ड बरोबरच्या कराराची आहे. सीरम इन्स्टीट्युट आणि ऑक्सफर्ड मिळुन लसीची निर्मिती करणार आहेत.

आता हिच लस निर्माण होऊन बाजारात यायला किमान 6 महिने तरी लागतील असे सीरम इन्स्टीट्युटचे अदर पुनावाला यांनी लसीविषयीच्या प्रश्नाचं उत्तर देताना सांगितले आहे.
कोरोनाची लस यायला अजून किमान सहा महिने लागतील. या वर्षीच्या शेवटपर्यंत लस येणं अपेक्षित आहे. सीरम इन्स्टिट्यूटने ऑक्सफर्डसोबत लस बनवण्यासाठी करार केला आहे. ऑक्सफर्डकडून लसीच्या सध्या मानवी चाचण्या सुरु आहेत. या चाचण्यांच्या तिसर्‍या टप्प्याचे निकाल आले की आपण लस कधी येणार यासंदर्भात बोलू शकू, असंही अदर पुनावाला यांनी सांगितलं.

पुण्यातील मायलॅबने आरटी पीसीआर टेस्ट करण्यासाठी नवीन मशीन आज लॉन्च केली. कोविडची टेस्ट करण्यासाठी आरटी पीसीआर टेस्ट सगळ्यात उपयुक्त आहे. या मशीनच्या लॉन्चिंग कार्यक्रमात अदर पुनावाला बोलत होते. सीरम इन्स्टिट्यूटतर्फे मायलॅब कंपनीमध्येही गुंतवणूक करण्यात आली आहे. पुढे बोलताना अदर पुनावाला म्हणाले की, नुकतीच एक बातमी आली होती की, लस बनवण्यासाठी एका कंपनीला घाई करण्यात आली. आम्हाला अशी घाई नाही. सुरक्षित आणि प्रभावी लस देणं हेच आमचं उद्दिष्ट आहे.

लस येईपर्यंत जास्तीत जास्त कोरोनाच्या चाचण्या करणं महत्त्वाचे आहे पण आपल्याकडे पाहिजे तेवढ्या चाचण्या होत नसल्याचा आरोपही त्यांनी केला. कोरोनाच्या चाचण्यांसाठी आवश्यक असलेले टेस्ट किट्सचं पुरेसं उत्पादन करण्याची भारतीय कंपन्यांची क्षमता आहे. पण तेवढ्या चाचण्याच केल्या जात नाही, असं अदर पुनावाला म्हणाले.

Tagged