devichi paradi bharane

कोरोना अपडेट

औसा येथे सुकून बघणारा आराधी निघाला कोरोना पॉझिटीव्ह

By Karyarambh Team

July 08, 2020

एका भोंदूबाबा मुळे तीन कुटुंबातील 20 जण संक्रमीत

औसा, दि. 8 : घराबाहेर पडू नका, धार्मिक कार्यक्रम घेऊ नका, लग्न समारंभाला मोजकेच पाहुणे बोलवा, असे प्रशासनाने कितीही सांगितले तरी लोक ऐकत नाहीत. लातुरच्या औसा तालुक्यातील सारोळा येथे देवीची परडी भरायची म्हणून एक कुटूंब आराध्याकडे गेले अन् आता तो आराधीच कोरोना पॉझिटीव्ह निघाला. त्यानंतर संपर्कातील त्या कुटुंबाचे स्वॅब घेतले असता तब्बल 20 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले.तत्पुर्वी या आराध्याच्या संपर्कात एक कोरोना पॉझिटीव्ह आला होता. पण त्याने स्वतःला होम क्वारंटाईन करून न घेतो परडी भरण्याच्या कार्यक्रम सुरुच ठेवला. शिवाय ‘सकून’ पाहून लिंबू आणि कुंकवावर फुंकर मारून त्याचा प्रसाद अनेकांना दिला. देवीचा प्रसाद समजून अनेकांनी ते लिंबू खाल्ले. त्यानंतर दोन दिवसांनी तो भोंदू बाबा कोरोना पॉझिटिव्ह निघाला. आता त्याच्या संपर्कात आलेल्या तीन कुटुंबांतील वीस जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. ‘सकून’ बघण्यासाठी त्या भोंदू बाबाने तोंडावाटे फुंकर मारून लिंबू आणि कुंकू भाविकांना खायला दिल्याच्या अघोरी प्रकारामुळेच सर्वांना कोरानाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे सारोळ्याच्या पोलीस पाटील यांनी औसा पोलीस ठाण्यात त्या भोंदूबाबाविरुद्ध तक्रार दिल्याने त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.