कोरोना अपडेट

परळीत कोरोनाचा धोका वाढला; सीईओंनी घेतला आढावा

By Karyarambh Team

July 08, 2020

परळी : येथील स्टेट बँक ऑफ इंडियामधील sbi parali अधिकारी आणि कर्मचार्‍यांना कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्याचे दिसून आल्या नंतर तेथील रूग्ण संख्येत वाढ होऊ लागली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांनी ceo ajit kumbhar जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.आर.बी.पवार dho dr.b.r.pawar यांच्यासमवेत परळी येथे भेट देऊन कोरोना संसर्गाच्या नियंत्रणासाठी सुरू असलेल्या आरोग्य सर्वेक्षण आणि विविध उपाययोजनांचा आढावा घेतला.

परळी मध्ये कोविड-19 केअर सेंटर सुरू करण्यात येणार असून या माध्यमातून परळी शहर आणि ग्रामीण भागात संशयित व्यक्तींचे घेतले जाणारे नमुने (थ्रोट स्वॅब) throat swab पुढील तपासणीसाठी पाठविण्याची निर्णय व संकलन प्रक्रिया परळी येथे केली जाणार आहे यामुळे संशयित व बाधित रुग्णांच्या उपचारांना अधिक गती मिळेल. यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी कुंभार यांनी संबंधित अधिकार्‍यांकडून आरोग्य यंत्रणेमार्फत सुरू असलेल्या उपाययोजनांचा आढावा घेतल्यानंतर यासह विविध सूचना दिल्या. यावेळी बँक अधिकारी व कर्मचार्‍यांच्या संपर्कात आलेल्या दीड हजार लोकांना होम क्वारंटाईन करणेची कार्यवाही तसेच त्यांचे पुढील पाठपुरावा करण्यासाठी परळी शहरातील नागरिकांच्या बाबतीत नगरपरिषदेचे मुख्याधिकारी कार्यवाही करतील तर ग्रामीण भागातील नागरिकांच्या बाबतीत गटविकास अधिकारी कार्यवाही करतील असे सूचित केले. बँक अधिकारी कर्मचारी यांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग पूर्ण झाले असून त्या व्यक्तींची नावे व पत्ते संबंधित शासकीय यंत्रणा पुढील कार्यवाहीसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहेत असे जिल्हा आरोग्य अधिकारी पवार यांनी यावेळी सांगितले. या आढावा प्रसंगी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.पवार, नायब तहसीलदार बाबुराव रुपनर, पंचायत समिती गटविकास अधिकारी संजय केंद्रे, नगर परिषद मुख्याधिकारी अरविंद मुंडे, तालुका गटशिक्षणाधिकारी गणेश गिरी, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.मोरे, उपजिल्हा रुग्णालयाचे डॉ.अर्षद शेख यांसह इतर विविध अधिकारी उपस्थित होते. यानंतर त्यांनी कोविड केअर सेंटर तसेच उपजिल्हा रुग्णालयाला भेट देऊन तेथील व्यवस्थेची पाहणी केली. Read karyarambh e paper