swab

जिल्ह्यातून 262 स्वॅब तपासणीसाठी पाठविले

कोरोना अपडेट न्यूज ऑफ द डे बीड

बीड :  जिल्ह्यातील आज एकूण 262 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. कोविड-19 च्या निश्चित निदानासाठी बीड जिल्ह्यातील खाली दर्शविल्याप्रमाणे थ्रोट स्वॅब स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, आंबाजोगाई येथे पाठविण्यात आले आहेत.

       यामध्ये जिल्हा सामान्य रुग्णालय बीड -16, स्वाराती ग्रा वै महाविद्यालय आंबाजोगाई -8, उपजिल्हा रुग्णालय परळी – 31, उपजिल्हा रुग्णालय केज-26, ग्रामीण रुग्णालय माजलगाव-22, उपजिल्हा रुग्णालय गेवराई -24, ग्रामीण रुग्णालय आष्टी -23, सीसीसी बीड -80, सीसीसी अंबाजोगाई -32 असे एकूण जिल्ह्यातून 262 स्वॅब तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. आजच्या या रिपोर्टकडे जिल्हावासीयांचे लक्ष लागले आहे.

Tagged