कोरोना अपडेट

बीड जिल्ह्यात पुन्हा 17 पॉझिटीव्ह

By Karyarambh Team

July 08, 2020

जिल्ह्यात पुन्हा एकदा खळबळ तब्बल

बीड ः बीड जिल्ह्यात पुन्हा एकदा 17 जण पॉझिटीव्ह आढळून आले आहेत. कालच 13 जण पॉझिटीव्ह आढळून आले होते. आज 262 स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यातील 238 निगेटीव्ह आले असून अनिर्णीत 7 स्वॅब आहेत. तर 17 जण पॉझिटीव्ह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.आज आढळून आलेल्यांमध्ये बीड तालुक्यातील 6, अंबाजोगाई तालुक्यात 3, परळी 6, गेवराई तालुक्यातील दोघांचा समावेश असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे सीईओ अजित कुंभार यांनी दिली.

सविस्तर वृत्त थोड्याच वेळात….

———-