corona-death

स्वॅब घेतलेल्या दोघांचा मृत्यू

कोरोना अपडेट न्यूज ऑफ द डे बीड

बीड : येथील जिल्हा रुग्णालयात beed civil hospital स्वॅब घेण्यात आलेल्या दोन व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक थोरात cs dr.ashok thorat यांनी ही माहिती दिली आहे.

बीड तालुक्यातील एक हृदयविकार असलेली महिला आणि गेवराई येथील एक पुरुष जिल्हा रुग्णालयात बुधवारी दाखल झाले होते. महिलेस हृदयविकार होता. तर पुरुषास डेग्यूची लागण झालेली होती. त्याच्या फुप्फूसात पाणी देखील झाले होते. त्यांना कोरोनाची लक्षणे दिसून येत असल्याने त्या दोघांना कोविड रुग्णालयात दाखल केले होते. त्यांचा स्वॅब घेतल्यानंतर काही तासांनी मृत्यू झालेला आहे. आता त्यांच्या अहवालाची प्रतीक्षा आहे.
Read E-PAPER karyarambh

Tagged